Maharashtra News: उजनी धरणातून भीमा नदीत १० हजार क्यूसेक पाणी सोडल्याने नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

Maharashtra News: उजनी धरणातून भीमा नदीत १० हजार क्यूसेक पाणी सोडल्याने नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Pckhabar-पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण ११७ टीएमसी पेक्षा म्हणजेच १२१.९३ टीएमसी भरले आहे. त्यामुळे आज (रविवार) सकाळी सात वाजता उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात दहा हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे .त्यामुळे उजनी धरण काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

उजनी धरण १०० टक्के भरल्यामुळे धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी आणि उद्योजकांनी आनंद व्यक्त केला आहे .११७ टीएमसीचे उजनी धरण भरून पाणी पातळी वाढल्यामुळे अखेर उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्याला सुरुवात झाली आहे .रविवारी सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पातळी पाणी पातळी ४९७.२२० मीटर होती .तर उजनीतील पाणीसाठा १२१.९३  टीएमसी झाला आहे .धरणात ५८ . २७  टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून उजनीची टक्केवारी १०८.७६ इतकी झाली आहे. दौंड मधून दहा हजार ५५१ चा विसर्ग सुरू आहे तर बंडगार्डन येथून ९ हजार ५० चा विसर्ग सोडल्यास येत असल्यामुळे उजनी धरणाचा पाणीसाठा वाढत चालल्यामुळे  आज (रविवार) सकाळी सात वाजल्यापासून धरणातून दहा हजार क्युसेक्स ने भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले आहे.

शनिवारी पुण्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरणात पाण्याचासाठा वाढू लागल्यामुळे शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या पुढे ५ हजार क्‍युसेकने भीमा नदीच्या पात्रात धरणातून पाणी सोडण्यात सुरुवात झाली. त्यानंतर रविवारी सकाळी यामध्ये आणखी पाच हजार क्युसेक्सने वाढ करून दहा हजार क्‍युसेकने भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. उजनीतुन पाणी सोडण्यात आल्यामुळे भीमा नदीला पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *