Nigdi News : सप्रेम नमस्कार, पत्रास कारण की…!


जागतिक टपाल दिनानिमित्त शिवयोद्धा प्रतिष्ठानतर्फे पोस्टमन काकांचा सन्मान
Pckhabar- जागतिक टपाल दिनानिमित्त आपल्या पत्रातील भावना आपल्या माणसांना पोहोचवणार्या आपल्या लाडक्या पोस्टमन काकांचा शिवयोद्धा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष अमोल तुकाराम भालेकर यांच्यातर्फे आज (शनिवार) श्रीफळ, शाल देऊन पेढा भरवून सन्मान करण्यात आला.
रुपीनगर पोस्ट ऑफिसमधील अधिकारी देविदास भुतांबरे, सुधाकर गोरड, संदिप पालवे, कर्मचारी मनोज दमाडे, संतोष देशमुख, किशोर ससाणे, बाबासाहेब सोनटक्के, हेंमत शिंदे, विलास शिंदे, बद्रिश्वर भोसले, मनोज जगताप, सुनिल हिरवे, नवनाथ देवकाते, करंडे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जेष्ठ नागरिक शंकर गवळी, उत्तम कांबळे व शिवयोद्धा प्रतिष्ठाणचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. एवढ्या वर्षांमध्ये प्रथमच झालेल्या या सत्कारामुळे सर्व कर्मचारी भारावून गेले. त्यांच्या भावना ओसंडून वाहत होत्या.
शिवयोद्धा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष अमोल भालेकर म्हणाले’’ इंटरनेटच्या काळात आजही लोकं टपालसेवेचा वापर करतात आणि त्यावरचा विश्वास कायम आहे. एका शहरातून दुसरीकडे टपाल पाठविण्याचं सर्वात सोपं आणि स्वस्त साधन आहे ते म्हणजे पोस्ट सेवा. वर्षानुवर्षे सर्व लोकांना टपाल, पत्र, तार इ. पोहोचवण्याच्या माध्यमातून टपाल खात्याचे सर्वच लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत.
आपल्या भागातील प्रत्येकाचे घर नावानिशी माहिती असणारा माणूस म्हणजे पोस्टमन काका. तुम्ही नुसते पत्रच नाही तर त्या माध्यमातून आमच्या भावना पोहचवण्याचे काम केले आहे. तसेच पोस्टाच्या नवनवीन योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत.’’ अशी ग्वाही अमोल भालेकर यांनी दिली.
आशिष मोटे यांनी आभार मानले.







Leave a Reply