Hinjwadi Crime News : प्लॉटचा ताबा न देता 12 जणांची 68 लाखांची फसवणूक; चार जणांवर गुन्हा दाखल

Hinjwadi Crime News : प्लॉटचा ताबा न देता 12 जणांची 68 लाखांची फसवणूक; चार जणांवर गुन्हा दाखल
Pckhabar- शिरगाव येथील साईबाबा मंदिराच्या मागे प्लॉट देण्याचे आमिष दाखवून 12 जणांकडून तब्बल 68 लाख 49 हजार घेतले. मात्र, प्लॉट न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2018 ते 2020 या कालावधीत प्रिस्टीन हॅरीझोन कंपनी हिंजवडी कार्यालयात घडला.

याप्रकरणी योगिता विमल दास (वय-38, रा. वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रतिक ओमप्रकाश आगरवाल, मोना आगरवाल, शुभम आगरवाल, कंपनीचे मॅनेजर किरण कुंभारकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांच्यासह 12 जणांना शिरगाव येथील साईबाबा मंदिराच्या पाठीमागे
प्लॉट देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी 12 जणांकडून तब्बल 68 लाख 49 हजार घेतले. मात्र, प्लॉटचा ताबा अथवा शासकीय रजिस्ट्रेशन केले नाही. तसेच पैसे परत न देता त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *