
Pimpri political News : आयकर विभागाच्या कारवाई विरोधात राष्ट्रवादीची निदर्शने
Pckhabar- उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरी केंद्रीय आयकर विभाग सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप करून याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहाराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली आज (शुक्रवार) पिंपरीत आंदोलन करण्यात आले.
पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, विक्रांत लांडे, समीर मासुळकर, राजू बनसोडे, युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, नगरसेविका वैशाली काळभोर, निकिता कदम, पोर्णिमा सोनवणे, संगीता ताह्मणे, माजी नगरसेवक अतुल शितोळे, काळूराम पवार, राजेंद्र साळुंखे, प्रवक्ते फजल शेख, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप आदी कार्यकर्ते आंदोलन सहभागी झाले आहेत.
“आम्ही सदैव अजितदादांसोबत”, we support ajit Dada, “आमची ताकद, आमचा अभिमान अजितदादा” असे फलक आंदोलकांनी हातामध्ये घेतले होते. हाताला काळी फित बांधली होती.










Leave a Reply