Pimpri News : शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम यांची निवड

 

Pimpri News : शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम यांची निवड
Pckhabar- पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी कैलास कदम यांची निवड आज (गुरूवार) निवड करण्यात आली आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. त्यांच्या जागी कैलास कदम यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यांच्या नावाची काँग्रेसचे General secretary आणि खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी नियुक्ती केली आहे.

एका सामन्य कामगराच्या
कुंटूबातील कदम यांचा जन्म एच.ए. हॅास्पीटल पिंपरी येथे झाला, शिक्षण एच.ए. स्कूल येथे इंग्रजी माध्यमतून झाले, कदम यांच्या नेतृत्वात १९९७ साली पहिली महिला बिनविरोध नगरसेविका निवडून आणली गेली, २००७ साली झालेल्या पिपंरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकीत कदम यांच्या वहिनी निर्मला कदम या नगरसेवक म्हणून निवडून आल्या. पुढे २०१२ साली ते स्वतः व त्यांचे बंधू हे वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आले.

पुढे कदम यांनी महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेते या व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य या महत्वाच्यां पदावर काम केले, ते इंटक चे पुणे जिल्हा अध्यक्ष व राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांनी कामगार क्षेत्रात अतिशय भरीव काम केले आहे. यांत अनेक ठिकाणी पगारवाढ करार, अनेक बेरोजगार युवकांना रोजगार देणे, कामगारांना नोकरीत कायम करणे, परदेशात विविध देशांमध्ये कामगार परिषदांना भारताच्या वतीने प्रतिनिधीत्व केले आहे. त्याच बरोबरीने त्यांनी कोकणातील असंख्य बांधवांना एकत्र करून पिपरी चिंचवड शहरा मध्ये कोकण विकास महासंघाची स्थापना केली.

एका कामगार नेत्याला काँग्रेस शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देत काँग्रेस नेतृत्वाने या औद्योगिक नगरीत कामगार व काँग्रेसचे संयुक्त समीकरण करून कौशल्यपुर्ण निर्णय घेतला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *