
Big News :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाच्या धाडी

Pckhabar- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर, साखर कारखान्यावर सकाळी आयकर विभागाच्या वतीने धाडी टाकल्या आहेत. तसेच त्यांच्या तीन बहिणींवर धाडी टाकल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले” माझ्या संबंधित कंपन्यांवर धाड टाकली याबद्दल मला काही म्हणायचं नाही. मी पण एक नागरिक आहे. मला एका गोष्टीचं दुख आहे, ज्यांची ३५-४० वर्षापूर्वी लग्न झाली, त्यांचा चांगल्या पद्धतीने संसार सुरु आहे. त्या तीन बहिणींवर, कोल्हापूरच्या आणि पुण्यातील दोन बहिणींवर धाडी टाकल्या. त्याचं कारण मला माहिती नाही. ते व्यवस्थित आपलं जीवन जगत आहेत. त्यांच्या मुलांची-मुलींची लग्न झाली आहेत, नातवंडं आहेत. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर राज्यातील जनतेने याचा जरुर विचार करावा, कोणत्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातो, हे पाहावं.”
माझ्या कंपन्यांवर धाड टाकली याचं मला काही नाही, पण नातेवाईकांवर धाड कशी . त्यांचा संबंध नसताना धाड टाकली याचं मला वाईट वाटलं. इतक्या खालच्या स्तरावर जाऊन राजकारण मला पटलेलं नाही. सरकार येत असतं जात असतं, पण जनता सर्वस्व आहे. जनता योग्य तो निर्णय घेत असते.










Leave a Reply