
Chinchwad News : वाल्हेकरवाडीत रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

Pckhabar- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपेने संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशनच्या माध्यमातून येत्या रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
संत निरंकारी सत्संग भवन श्रीपती कॉलोनी राजयोग पेट्रोल पंपा जवळ वाल्हेकरवाडी या ठिकाणी सकाळी 8 ते संध्याकाळी 4 या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या चालु असलेल्या covid-19 महामारीच्या काळामध्ये रक्ताचा खुप तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर फौंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन सरकारी नियमांचे पालन करून करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून या मानवतेच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन संत निरंकारी मंडळाचे रामचंद्र लाड (ब्रँच मुखी वाल्हेकरवाडी ) यांनी केले आहे. अधिक माहिती साठी संपर्क काका माने –8080138598 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बी टी महाजन यांनी केले आहे.






Leave a Reply