
Dehugaon News : इंद्रायणी नेत्र रुग्णालयातर्फे नवरात्रौत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी
‘नारी शक्तीच्या सन्माना’साठी नऊ दिवस महिलांसाठी विशेष शिबीर
डॉ.स्वप्निल चौधरी यांची माहिती

Pckhabar- जगद्गगुरु तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तीर्थक्षेत्र देहुगाव येथे ‘इंद्रायणी नेत्र रुग्णालय व फेको सेंटर’ या ठिकाणी नारीशक्तीचे प्रतीक असलेल्या नवरात्रौत्सवानिमित्त ‘नारी शक्तीचा सन्माना’साठी नऊ दिवस महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
देहूगाव-येलवडी रोड वरील दशप्रभा हाईट्स, पहिला मजला येथील डोळ्यांच्या आजारावरील एकमेव उपचार केंद्र असलेल्या इंद्रायणी नेत्र रुग्णालय व फेको सेंटर’ मध्ये नऊ दिवस महिलांसाठी मोफत शिबीर होणार आहे.
याबाबत माहिती देताना डॉ.स्वप्निल चौधरी म्हणाले” कोरोनामुळे गेल्या दिड वर्षांपासून ऑनलाईन ऑफिस वर्क सुरू आहे. त्यामुळे अनेक महिलांना कमी दिसणे, डोळ्यावर पडदा येणे, डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यांना पाणी येणे आदी समस्या येत आहेत. डोळ्यांच्या सर्व आजारांवर मोफत तपासणी व मार्गदर्शन या नऊ दिवसांमध्ये होणार आहे. जास्तीत- जास्त महिलांनी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. चौधरी यांनी केले आहे.






Leave a Reply