Bhosari Crime News : ह्युदाई कंपनीचे बनावट स्पेअर पार्टस विक्री करणार्या एकावर गुन्हा
Pckhabar- ह्युदाई कंपनीचे बनावट स्पेअर पार्टस विक्री करून कंपनीची व ग्राहकांची फसवणूक करणार्या एका स्पेअर पार्टस विक्रेत्यावर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. विक्रेत्याने 31 हजार 710 रूपयांचे 29 बनावट पार्टस व्रिकीसाठी ठेवलेल्या आढळून आले आहेत. हा प्रकार कासारवाडीतील पोपटलाल डी. मेहता स्पेअर पार्टस या दुकानात घडला.
दिनेश गंडालाल शहा (वय-65, रा. रोहन इंन्क्लुड सोसायटी, दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी ह्युदाई कंपनीचे प्रतिनिधी रेवननाथ विष्णू केकान (वय-38, रा. हडपसर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे कासारवाडी येथे पोपटलाल डी. मेहता स्पेअर पार्टस नावाने दुकान आहे. या दुकानात आरोपीने ह्युदाई कंपनीचे बनावट स्पेअर पार्टस विक्री करून कंपनीची व ग्राहकांची फसवणूक केली. विक्रेत्याने 31 हजार 710 रूपयांचे 29 बनावट पार्टस व्रिकीसाठी ठेवलेल्या आढळून आले आहेत. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
Bhosari Crime News : ह्युदाई कंपनीचे बनावट स्पेअर पार्टस विक्री करणार्या एकावर गुन्हा










Leave a Reply