Sangvi Crime News : गॅसचा काळा बाजार, दोघांना अटक
Pckhabar- घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीरपणे गॅस काढून गॅसचा काळा बाजार करणार्या दोघांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 31 गॅस सिलेंडर, एक टेम्पो, वजन काटा असे 1 लाख 92 हजारांचे साहित्य जप्त केले आहे.
चंद्रप्रकाश विक्रमसिंग ठाकुर (वय-19), मनोज महावीर भारव्दाज (वय-29, दोघेही रा. प्रभातनगर, पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक अरूण पांडुरंग नरळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरमधून गॅस काढून घेत गॅसची चोरी करत असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पवना नदी पात्रात किलबील शाळेच्या पाठीमागे छापा टाकला. आरोपी सिलेंडरमधून गॅसची चोरी करत असल्याचे दिसून आले. गॅस मालकांना रिकामे गॅस सिलेंडरपैकी काही सिलेंडर जमा न करता नदी पात्रात आणून त्यामध्ये गॅस भरत होते. आरोपींकडून 31 गॅस सिलेंडर, एक टेम्पो, वजन काटा असे 1 लाख 92 हजार 717 रूपयांंचे साहित्य जप्त केले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
Sangvi Crime News : घरगुती गॅसचा काळा बाजार, दोघांना अटक






Leave a Reply