Pimpri News : कन्या विद्यालयाची गुणवत्तेकडून उत्कृष्टतेकडे वाटचाल : मुख्याध्यापिका शारदा शेटे

Pimpri News : कन्या विद्यालयाची गुणवत्तेकडून उत्कृष्टतेकडे वाटचाल : मुख्याध्यापिका शारदा शेटे
कन्या विद्यालयात देणगीदारांचा सन्मान
Pckhabar- रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयाची गुणवत्तेकडून उत्कृष्टतेकडे वाटचाल सुरू असून विद्यार्थीनिंच्या सुविधांसाठी शाळेतील सर्व अध्यापकवृंद विषेश प्रयत्न करत आहेत, असे प्रतिपादन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत मंगळवारी विद्यालयास गरीब विद्यार्थीनी सहाय्य निधीस देणगी रूपाने रक्कम देणाऱ्या देणगीदारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका शेटे बोलत होत्या.

या कार्यक्रमासाठी श्रीमती सुमन बांदल, अनुपमा फडतरे, अस्मिता फडतरे या अतिथी लाभल्या. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे व पर्यवेक्षिका उर्मिला पाटील व अध्यापक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अतिथी व देणगीदार नेहा पराग बांदल यांनी मातोश्री श्रीमती सुमन बांदल यांच्या हस्ते शाळेतील गरीब विद्यार्थी सहाय्य निधी साठी रु वीस हजार रकमेचा धनादेश मुख्याध्यापिका शारदा शेटे यांचेकडे सुपूर्द केला. आपले मनोगत व्यक्त करताना या शाळेच्या एक पालक म्हणून दातृत्व गुणातून शाळेचा ऋण निर्देश करण्याची संधी मिळाली व पुढेही भविष्यात शाळेला मदत करण्याचे मनोगत व्यक्त केले.

अतिथी अस्मिता फडतरे व अनुपमा फडतरे यांनी शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित अतिथींचा विद्यालयाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे आभार विद्यालयाच्या सन्माननीय पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांनी व्यक्त केले. सुत्रसंचालन अनघा रांगणेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *