Akurdi Rotary News : शिक्षकांसाठी ऑनलाईन व्याख्यान;रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचा उपक्रम
Pckhabar- शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘रोटरी क्लब ऑफ आकुर्डी’ तर्फे शालेय शिक्षकांसाठी शिकवताना स्फूर्ती यावी व कोरोनामुळे घरातून शिकवताना आलेली मरगळ घालविण्यासाठी मौसमी आचार्य यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे तीन ऑनलाईन व एक प्रत्यक्ष असे आयोजन करण्यात आले होते.
दि. 26 सप्टेंबर 2021 रोजी रोटरी कम्युनिटी हाँलमध्ये समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रजनबोधीनी स्कूल, खिंवसरा पाटील विद्या मंदिर व टिळक माध्यमिक विद्यालय मधील 70 शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये मौसमी आचार्य व श्रीमती संगीता खोजे यांनी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.
त्यानंतर सर्व शिक्षकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. सर्वांची रक्त तपासणी आणि दंत चिकित्सा करण्यात आली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष गौरव शर्मा, सेक्रेटरी रामेश्वर लाहोटी, प्रोजेक्ट डायरेक्टर शशिकांत शर्मा, खजिनदार जिग्नेश आगरवाल, मेंबरशिप डायरेक्टर कल्याणी कुलकर्णी, अँडमिन डायरेक्टर अनिंदिता मुखर्जी, पब्लिक इमेज डायरेक्टर सिमा शर्मा, क्लब ट्रेनर जितेंद्र शर्मा, सदस्य अशोक मेहेर, डॉ. उदय जामखेडकर, डॉ गोवांडे तसेच विनीत कुलकर्णी व वृषाली मेहेर उपस्थित होते.










Leave a Reply