Lonavala News : लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ इंदाैर-दौंड एक्‍स्‍प्रेसचे दोन डबे घसरले

Lonavala News : लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ इंदाैर-दौंड एक्‍स्‍प्रेसचे दोन डबे घसरले
Pckhabar-लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ इंदाैर-दौंड एक्‍स्‍प्रेसचे दोन डबे घसरले. यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली. हा प्रकार आज (सोमवार) सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

इंदाैर-दौंड एक्‍स्‍प्रेसचे दोन डबे घसरल्याचे समजताच रेल्‍वे प्रशासनाने रेल्‍वेचे डब्‍बे रूळावर आणण्याचे काम युध्दपातळीवर सुरू केले आहे. दरम्‍यान रेल्‍वेचे डबे पूर्ववत रूळावर बसवले असून, गाडी मार्गस्‍थ केली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे.

मुंबईहून पुण्याला इंदाैर-दौंड एक्‍स्‍प्रेस निघाली होती, तेंव्हा लोणावळा स्टेशनवरील एक नंबर प्लॅटफॉर्मवर रेल्वे अचानक दोन बोगी घसरल्या. या बोगीत प्रवासी  होते. रेल्वेचे स्पीड कमी केल्याने मोठी दुर्घटना टळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *