Hinjawadi Crime News : प्रेमभंग झाल्यामुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Hinjawadi Crime News : प्रेमभंग झाल्यामुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Pckhabar-प्रेयसीने तरुणाचा प्रेमभंग केल्याने करून तिच्या नातेवाईकांनी त्रास दिल्यामुळे यातून आलेल्या नैराश्यातून  तरुणाने हिंजवडी येथील एका हॉटेलमध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.  ही घटना मारुंजी येथे घडली.

पंकज श्रीकृष्ण उबाळे (वय 20, रा. वाघाळा, परळी वैजनाथ, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रेयसी, एकनाथ सावंत, सत्यजित सावंत, उद्धव सावंत, अनिरुद्ध सावंत अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मृत पंकज यांचा मामा यांनी सोमवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज याचे आरोपी तरुणीशी प्रेमसंबंध होते. तिने प्रेमसंबंध तोडल्यानंतर इतर आरोपीने पंकजला शारीरिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून पंकजने 27 ऑगस्ट रोजी मारुंजी येथील ओयो फ्लॅगशिप हॉटेल येथे नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

फौजदार महेंद्र गाढवे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *