Dehu Crime News : पैसे घेऊन बांधकाम पूर्ण न करता फसवणूक
Pckhabar- पैसे घेऊन डेव्हलपर्सने बांधकाम करून न देता तिघांची सहा लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एक जून 2019 ते 25 ऑगस्ट 2021 या कालावधीत कस्तुरी डेव्हलपर्स, देहूगाव येथे घडली.
राहुल माने, तुषार हेडा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत नारायण खाचु पाटील (वय 31, रा. देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचे मित्र संदीप राखुंडे आणि रामदास सनिंसे यांच्याकडून आरोपींनी बांधकाम करून देण्यासाठी पाच लाख 96 हजार रुपये घेतले. मात्र आरोपींनी बांधकाम पूर्ण न करता तसेच खरेदी खत करून न देता पैशांचा अपहार आणि फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
Dehu Crime News : पैसे घेऊन बांधकाम पूर्ण न करता फसवणूक










Leave a Reply