Pimpri News : … म्हणून न्यायालयाने ॲड. नितीन लांडगे यांचा जामीन अर्ज फेटाळला
Pckhabar- लाच प्रकरणात तात्पुरत्या जामिनीवर सुटण्यासाठी खोटी माहिती दिल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे सभापती नितीन लांडगे यांचा जामीन कायम करायला विशेष न्यायालयाने आज (गुरूवार) नकार दिला.
लांडगे यांनी तात्पुरत्या जामीनासाठी आजी (आईची आई) ताराबाई बोऱ्हाडे यांच्या निधनाचे कारण दिले होते. मात्र, ताराबाई बोऱ्हाडे या लांडगे यांच्या वडिलांची मावशी असल्याचे समजते. त्यामुळे त्यांनी न्यायालयाला खोटी माहिती देऊन तात्पुरता जामीन मिळावल्याचे दिसून येत असल्याचे ‘एसीबी’ पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने लांडगे यांना जामीन देण्यास नकार दिला. तसेच न्यायालयीन कोठडी सुनावत येरवडा जेलमध्ये रवानगी केली.







Leave a Reply