Bhosari News: ‘असेल हिम्मत तर आडवा, रणसंग्राम 2022’

Bhosari News: ‘असेल हिम्मत तर आडवा, रणसंग्राम 2022’

महेशदादा समर्थक विकास डोळस यांची फेसबुक पोस्ट व्होतेय व्हायरल
Pckhabar- आमागी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात अनेक घडामोडी, उलथापालथी होत आहेत. राज्यातील सरकारकडून भाजप आमदारांची कोंडी केली जात असल्याचा सूर नागरिकांमधून ऐकायला येत आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक ‘इ’ प्रभाग समितीचे सभापती विकास डोळस यांची फेसबुकपोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. असेल_हिम्मत_तर_आडवा ! रणसंग्राम_2022 ! अशी फेसबुकपोस्ट त्यांनी केली आहे. त्यावर समर्थनार्थ प्रचंड प्रतिक्रिया कार्यकर्ते, नागरिकांनी दिल्या आहेत.

नगसवेक विकास डोळस आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, ” असेल_हिम्मत_तर_आडवा ! रणसंग्राम_2022 ! बरेच तर्क वितर्क व चर्चांना सध्या उधान आले आहे. परंतु, एकच सांगतो राजकारणात ज्याच्या पाठीशी जनता आहे. त्याचे कोणीही वाकडे करू शकत नाही. एका वृत्तपत्रात छापून ही आले होते की पिंपरी-चिंचवड काय राज्यातील बरेच मोठे नेते महेशदादांना अडचणीत आणायचे प्रयत्न करत आहेत”.

”पण, कोणीच त्यांचे काहीच करू शकले नाही. कारण एकच ते म्हणजे मायबाप जनता दादांच्या पाठीशी आहे. आणि हो राहिली गोष्ट दादांच्या कार्यकर्त्यांची….आमचे राजकारणच दादांपासून चालू झालंय……ज्या दिवशी दादांबरोबर नसेल…..त्या दिवशी राजकारणातच नसेल” ! या फेसबुक पोस्टची भोसरी परिसरात जोरदार चर्चा होत आहे. ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून त्यावर कार्यकर्ते, समर्थकांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *