Maharashtra News : मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री राणे यांचे आक्षेपार्ह विधान

Maharashtra News : मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री राणे यांचे आक्षेपार्ह विधान

मंत्री नारायण राणे यांना अटक होणार?

Pckhabar-जन आशीर्वाद यात्रेनिमित्त रायगडच्या दौऱ्यावर असणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड येथील पत्रकार परिषदेमध्ये सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत  आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राणे यांच्यावर नाशिक, पुणे आणि महाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणे यांना पोलिसांकडून अटक केली जाण्याची शक्यता आहे.

समाजातील एकोप्यास बाधा आणण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे विरोधात राणे यांच्यावर विविध कलमा अंर्तगत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महाड येथील पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. १५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणासंदर्भात टीका करून मी त्या ठिकाणी असतो तर मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली चढवली असती, असे वक्तव्य करून राणेंनी मुख्यमंत्र्यांचा अपमान केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *