Pimpri News : भाजपने स्थायी समिती अध्यक्षांचा त्वरित राजीनामा घ्यावा : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Pimpri News : भाजपने स्थायी समिती अध्यक्षांचा त्वरित राजीनामा घ्यावा : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Pckhabar- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी सातत्याने भ्रष्टाचाराविरोधात बोलत असतात. महापालिका स्थायी समिती अध्यक्षांना लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. याप्रकरणी भाजपने योग्य ती भूमिका घेऊन स्थायी समिती अध्यक्षांना तातडीने राजीनामा द्यायला सांगितले पाहिजे, असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज (सोमवार) व्यक्त केले.

विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गो-हे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, गटनेते राहुल कलाटे, आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *