Shravan Special : जाणून घेऊया  तीन ज्योतिर्लिंगांचं  महत्त्व आणि त्यांची महती!

Shravan Special : जाणून घेऊया  तीन ज्योतिर्लिंगांचं  महत्त्व आणि त्यांची महती!

Pckhabar- महादेवांच्या भारतातील प्रमुख 12 मंदिरांना 12 ज्योतिर्लिंगे म्हणतात. या 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंगे आहेत. आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी आपण सहा
ज्योतिर्लिंगांची माहिती जाणून घेतली होती. आज श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्त तीन ज्योतिर्लिंगांची माहिती घेऊ. यामध्ये रामेश्वर, नागेश्वर आणि विश्वेश्वर या ज्योतिर्लिंगांची माहिती जाणून घेऊ.

रामेश्वर (तामिळनाडु – रामेश्वर)–

 हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम बेटावरील एक शिवमंदिर आहे. प्रभू रामचंद्रांनि रावणाविरुद्ध झुंजलेल्या युद्धातील पापांचे क्षालन करण्यासाठी या ठिकाणी वाळूचे शिवलिंग बनवून भगवान शंकराची आराधना केली. त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात निवास करण्याचे वचन भगवान रामचंद्रांना दिले. हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी व चार धामांपैकी एक मानले जाते. विशाल नंदी व १००० फुट लांब , ६५० फुट रुंद आणि १२५ फुट उंच असे रामेश्वर चे मंदिर आहे. वार्षिक उत्सवाच्या वेळेस भगवान शंकर व पार्वती ची सोन्या चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक काढली जाते.

नागेश्वर (महाराष्ट्र – औंढा नागनाथ)

पांडवांच्या १४ वर्षाच्या अज्ञातवासात धर्मराज युधिष्ठीर याने औंढा नागनाथाचे मंदिर बांधल्याचे, त्याने महादेवाची स्थापना केल्याचे म्हटले जाते. हेमाडपंती शैलीचे हे नागनाथाचे मंदिर असून याचा विस्तार ६०,००० चौ. फूट एवढा प्रचंड आहे. महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नाही, तर नंदिकेश्वराचे स्वतंत्र मंदिर बाजूला आहे हे येथील वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या आवारात १२ ज्योतिर्लिंगाची छोटी-छोटी मंदिरे असून, १०८ महादेवाची मंदिरे आणि आणखी ६८ महादेवाच्या पिंडी आहेत. याशिवाय वेदव्यासलिंग, भंडारेश्वर, नीलकंठेश्वर, गणपती, दत्तात्रय, मुरलीमनोहर, दशावतार यांची देखील मंदिरे आहेत.

मंदिरावर शिल्पकलेचे उत्कृष्ट काम केलेले आहे. परिसरात मोठे मैदान असून आठ खांबांचे मोठे दालन आहे. संत विठोबा खेचर हे इथलेच. संत नामदेव हे जवळच असलेल्या नरसीचे होते. असे समजले जाते, की, संत नामदेव जेव्हा कीर्तन करीत होते, त्या वेळी नागनाथ मंदिराने आपले तोंड त्या दिशेला फिरवले होते.

औंढा नागनाथच्या शेजारील राजापूर गावातील उत्खननात प्राचीन काळच्या सुंदर व रेखीव अशा मूर्ती सापडल्या आहेत. सिद्धेश्र्वर व येलदरी ही प्रसिद्ध धरणे व पर्यटनाची ठिकाणे येथून जवळच आहेत. औंढा-नागनाथला जाण्यासाठी परभणीहून ४०-४५ मिनिटे लागतात. नांदेड या शहरापासून ६४ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यात, औंढा नागनाथ हे स्थान आहे.

विश्वेश्वर (उत्तर प्रदेश – वाराणसी)–

विश्वेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते.पूर्वी वाराणसीत काशी विश्वनाथ मंदिर होते. वाराणसी भारताची सांस्कृतिक राजधानी असून ते भारताची पवित्र नदी गंगाच्या किनार्यावर वसलेले आहे. शहराच्या मध्यावर विश्वीनाथ मंदिर असून तेथे भगवान शिव, विश्वेतश्वगर किंवा विश्वेनाथ ज्याकतिर्लिंग स्थापलेले आहे. श्री विश्वेश्वर ज्योतिर्लिंग हे कोणाच्या तपस्येने तयार झाले नसून येथे साक्षात भगवान शिव हेच विश्वनाथ च्या रूपात प्रकट झाले. असे म्हणतात कि येथे मृत्यू येणाऱ्या प्रत्येकास मोक्ष प्राप्ती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *