Sangvi News : भाजपला धक्का, भाजप नगरसेविकेच्या पतीचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
Pckhabar- भारतीय जनता पक्षाच्या पिंपळे गुरव येथील विद्यमान नगरसेविका चंदा लोखंडे यांचे पती आणि माजी नगरसेवक, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती राजू लोखंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शुक्रवारी प्रवेश केला. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपला चांगलाच धक्का बसला आहे.
पुण्यात झालेल्या या प्रवेशावेळी महाराष्ट्र राज्य वारकरी पिंपरी चिंचवड विभागाचे माजी अध्यक्ष विजय आण्णा जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, स्थायी समितीचे माजी सभापती अतूल शितोळे आदी उपस्थित होते.
याबाबत माजी नगरसेवक राजेंद्र जगताप म्हणाले, ’’लोखंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला प्रवेश ही सुरूवात आहे. आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्तेत असलेल्या भाजपच्या कारभाराला कंटाळून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली 25 ते 30 नगरसेवक तर चिंचवड विधानसभेतून 10 ते 15 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. सांगवी, पिंपळे गुरव भागात भाजपचे 12 नगरसेवक आहेत. यामधीलही 3 ते 4 नगरसेवकांसह अनेक कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली.’’







Leave a Reply