Pimpri News : चार लाचखोर कर्मचाऱ्यांचे महापालिका सेवेतून निलंबन

Pimpri News : चार लाचखोर कर्मचाऱ्यांचे महापालिका सेवेतून निलंबन
Pckhabar- लाचखोरीत अटक झालेल्या पिंपरी महापालिकेच्या (PCMC) चार कर्मचाऱ्यांना आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी निलंबित केले असून, त्यांची खातेनिहाय चौकशीही सुरु केली आहे. याबाबत आयुक्त पाटील यांनी काल रात्री उशिरा आदेश काढला आहे.

बुधवारी एका जाहिरात ठेकेदाराकडून एक लाख १८ हजार रुपयांची लाच घेताना पाच जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली. त्यांना आजपर्यंत (शनिवार) पोलीस कोठडी मिळाल्याने दोन लिपिक तथा कारकून (क्लार्क), एक संगणक चालक (कॉ़म्पुटर ऑपरेटर) आणि एक शिपाई अशा चार महापालिका कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी दणका देत निलंबित केले. त्यांच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशीही लावली आहे.

स्थायी समिती कार्यालयातील मुख्य लिपिक ज्ञानेश्वर किसन पिंगळे, लिपिक विजय शंभूलाल चावरिया, संगणक चालक राजेंद्र जयवंतराव शिंदे आणि शिपाई अरविंद भीमराव कांबळे अशी त्यांची नावे आहेत. निलंबनकाळात त्यांना शहर सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *