Talegaon Dabhade News : आपत्ती व्यवस्थापनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान

 

Talegaon Dabhade News : आपत्ती व्यवस्थापनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान

Pckhabar- अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन कामात व बचाव कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, शिवदुर्ग मित्र लोणावळाचे सचिव सुनील गायकवाड, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे किरण मोकाशी, अनिल आंद्रे, गणेश निसाळ, शुभम काकडे, भास्कर माळी, गणेश ढोरे, शिवदुर्ग संस्थेचे राजेंद्र कडू, महेश मसने, प्रविण देशमुख, अग्निशमन अधिकारी-पदमनाथ कुल्लरवार, आकाश ओव्हाळ, निरंजन भेगडे यांचा सन्मान करण्यात आला.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमामध्ये नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, भाजप पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, गटनेते अरुण भेगडे यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक संतोष दाभाडे, संतोष शिंदे, रवि दाभाडे, नगरसेविका निता काळोखे, हेमलता खळदे, संध्या भेगडे, मंगल जाधव, विभावरी दाभाडे, प्राची हेंद्रे , काजल गटे, मंगल जाधव , कल्पना भोपळे, वैशाली दाभाडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

याबाबत नगराध्यक्षा चित्रा जगनाडे म्हणाल्या ” पुर परिस्थितीत व दऱ्याखोऱ्यात अडकलेल्या लोकांना वाचवणे , वन्य जीवांना जीवदान देने तसेच मानवी वस्तीत आलेल्या सापांना पुन्हा जंगलात सोडणे आशा प्रकारे मानवतेला शोभणारे कार्य ते करत असतात म्हणून त्यांच्या प्रति आभार व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *