
Pimpri News : दरोडेखोर..दरोडेखोर भाजप दरोडेखोर…घोषणांनी महापालिका दणाणली
शिवसेनेचे महापालिका मुख्यालयासमोर भाजपच्या निषेधार्थ आंदोलन
Pckhabar- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे स्थायी समिती सभापतींना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने दहा लाखाची लाच मागितली म्हणून रंगेहाथ पकडले. त्यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना दोन दिवस पोलिस कोठडी मिळाली. इतिहासात पहिल्यादांच भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळे पिंपरी-चिंचवड शहराची देशासह राज्यात नाहक बदनामी झाली आहे.
गेल्या साडेचार वर्षात भाजपच्या कारभा-यांनी नागरिकांच्या पैशावर दरोडा टाकला आहे. त्याच्या निषेधार्थ आज (शुक्रवार) महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, सह संपर्क प्रमुख योगेश बाबर, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, अनंत कोर्हाळे, मधुकर बाबर, धनंजय आल्हाट, सचिन सानप यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.






Leave a Reply