
Pimpri Crime News : केवायसी अपडेटसाठी पाठवलेली लिंक क्लिक केली अन् महिलेच्या खात्यावरून दीड लाख गायब झाले!
Pckhabar- केवायसी अपडेट करा, नाही तर तुमचे अकाउंट बंद करण्यात येईल, असे मेसेज करुन एका महिलेला लिंक पाठवली. एकाने एस बी आय बँकेतून बोलत असल्याचे सांगून इंटरनेट बँकींग करत असताना ओ टी पी सेंड होत नाही. त्यामुळे लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडून महिलेच्या बॅक खात्यावरील दीड लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करुन फसवणूक केली. हा प्रकार पिंपरी येथे घडला आहे.
याप्रकरणी मोरवाडी येथे राहणाऱ्या महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
अज्ञात इसमाने फिर्यादी यांना मोबाईल नंबर 8597861251 आणि 9775596198 या मोबाईल नंबर वरून
महिलेला मॅसेज केला. तुमचे केवायसी अपडेट करा. नाहीतर तुमचे अकाउंट रद्द करण्यात येईल असे मेसेज करुन लिंक पाठवली. एकाने महिलेला फोन करून मी एस बी आय बँकेतून बोलत असल्याचे खोटे सांगितले. आपल्याला इंटरनेट बँकींग करत असताना ओ टी पी सेंड होत नाही असे आम्हाला समजले आहे. तुम्हाला केवायसीच्या आलेल्या लिंकवर तुम्ही क्लीक करुन तुम्ही तुमच्या तक्रारीचे निवारण करु शकता असे सांगितले.
त्यामुळे फिर्यादीने सदर लिंकवर क्लीक केले असता फिर्यादीचे एस बी आय बँक चाकण शाखा खाते मधून 1 लाख 57 हजार 699 रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करुन घेवून फिर्यादी यांची फसवणूक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक मिसाळ अधिक तपास करत आहेत.






Leave a Reply