Pimpri News : दुसऱ्या, चौथ्या गुरुवारी कौशल्य विकास व नोकरी मेळावा


Pimpri News : दुसऱ्या, चौथ्या गुरुवारी कौशल्य विकास व नोकरी मेळावा

कौशल्य विकास प्रमुख लायन अशोक येवले यांची माहिती
Pckhabar- कौशल्य विकास व नोकरी मेळाव्याला बेरोजगार तरुणांना दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. या तरूणांना रोजगार मिळवून देण्यासाठी आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या गुरुवारी “कौशल्य विकास व नोकरी मेळाव्याचे “आयोजन केले जाईल, असे कौशल्य विकास प्रमुख लायन अशोक येवले यांनी सांगितले.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक पिंपरी, येथील लायन्स स्किल सेंटर या ठिकाणी “कौशल्य विकास व नोकरी मेळावा ३” चे गुरुवार,दिनांक १९ऑगस्ट रोजी ११ ते २ या वेळेत लायन्स क्लब्स इंटरनॅशनल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका,स्टाफ ब्लूम  व  युनिक कौशल्य विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते.

७२ गरजूंचे समुपदेशन करण्यात आले व  त्यातून ४७ जणांना त्यांचे शिक्षण आणि कौशल्यनुसार विविध कंपन्यामध्ये मुलाखतीसाठी पाठविण्यात येईल .२५ जण वय व शिक्षणाच्या अटीत बसू शकले नाहीत.

या मेळाव्यास भारतीय औद्योगिक संस्थेचे डायरेक्टर नंदकिशोर जगदाळे, गोदरेज अँड बॉयसी ट्रेनिंगचे प्रमुख राजन जोशी, युनिक कौशल्य विकासच्या मुक्ता खासनीस व स्टाफ ब्लूमचे जयंत तांबडे व संदीप पाटील यांनी संबोधित केले.

शिस्तीचे अनन्यसाधारण महत्व नोकरी, व्यवसाय तसेच दैनंदिन जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असल्याचे जगदाळे यांनी नमूद केले. सरकारी व खाजगी आय टी आय संस्थांमधून विनामूल्य शिक्षणाच्या संधी उपलब्ध असून त्याचा गरजूंनी लाभ घ्यावा असे त्यांनी आवर्जून सांगितले.

आजच्या स्पर्धेच्या युगात वैयक्तिक प्रगतीसाठी इतरांपेक्षा  एक पाऊल पुढे  असणे आवश्यक असल्याचे श्री राजन जोशी यांनी उदाहरणासहित स्पष्ट केले.

लायन्स सेंटर मध्ये कॉम्पुटर व फॅशन डिझाईनचे कोर्सेस लवकरच सुरू करणार असल्याची माहिती श्रीमती मुक्ता खासनीस यांनी सांगितली.

बँकिंग संदर्भातील ४० दिवसाचा कोर्स व तो यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर नोकरीची संधी  याबद्दल जयंत तांबडे व संदीप पाटील यांनी सविस्तर माहिती  सांगितली.

लायन वसंत गुजर, प्रदीप कुलकर्णी, उज्वला कुलकर्णी पुराणिक यांनी मेळाव्यास भेट देऊन आयोजकांचे मनोधैर्य वाढविले, अशी माहिती
कौशल्य विकास प्रमुख एम जे एफ लायन अशोक येवले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *