Akurdi News: ‘आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींनी आर्थिक नियोजन करणे काळाची गरज’

Akurdi News: ‘आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींनी आर्थिक नियोजन करणे काळाची गरज’

Pckhabar-आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींनी आपल्याला मिळालेल्या पैशातून काही पैशांची बचत करावी. वर्षभराचे आर्थिक नियोजन करणे काळाची गरज आहे, असे मत रोटेरियन कांचन कुलकर्णी व केशव ताम्हणकर यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे खानदेश मराठा मित्र मंडळ येथे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त रोटेरियन कांचन कुलकर्णी व केशव ताम्हणकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कुलकर्णी, ताम्हणकर बोलत होते.

याप्रसंगी अध्यक्ष गौरव शर्मा, सेक्रेटरी, रामेश्वर लाहोटी, क्लब ट्रेनर  जितेंद्र शर्मा, प्रोजेक्ट डायरेक्टर शशिकांत शर्मा, सदस्य  प्रवीण आगरवाल, अशोक मेहेर उपस्थित होते.

कोरोनाचे सर्व नियम पाळून हे व्याख्यान 50 नागरिकांच्या उपस्थितीत घेण्यात आले.

रोटेरियन कांचन कुलकर्णी व केशव ताम्हणकर पुढे म्हणाले ”  वाढते खर्च लक्षात घेता आर्थिक नियोजन करणे गरजेचे झाले आहे.  नियोजन न केल्यास आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांपुढे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या उत्पन्नानुसार आर्थिक नियोजन करावे,” असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे संयोजन माजी अध्यक्ष रोटेरियन विजय तारक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *