Pimpri News : महापालिकेवर प्रशासक नियुक्त करुन भाजपच्या चाडेचार वर्षाच्या कारभाराची चौकशी करा: कॉग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे
Pckhabar- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी केलेली कारवाई ही शहराच्या नावलौकिकास काळीमा फासणारी घटना आहे.
राज्य सरकारने महापालिकेवर प्रशासक नियुक्त करुन मागील चाडेचार वर्षातील आर्थिक उलाढालीची निःपक्षपाती पणाने चौकशी करावी, अशीही मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.
बुधवारी (दि. 18 ऑगस्ट) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षांच्या दालनात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी कारवाई करुन अध्यक्षांसह इतर चार कर्मचा-यांना अटक केली. एवढी मोठी कारवाई पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच झाली आहे. या प्रकरणाबाबत स्थायी समितीतील इतर पक्षीय सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहिर खुलासा करुन नागरीकांना अवगत करावे.
भाजपाच्या अखत्यारीत असणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हातात हात घालून संगनमताने भ्रष्टाचार करीत आहेत. त्याचाच हा परिपाक आहे. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. प्रदेश भाजपाने व स्थानिक भाजपा पदाधिका-यांनी या धोरणाचे पाईक आहोत हे सिध्द करावे, असेही साठे यांनी म्हटले आहे.
जनतेच्या कर रुपी पैशांची ही लूट आहे. महानगरपालिकेच्या चतुर्थश्रेणी कर्मचा-यांपासून उच्चपदस्थ अधिका-यांपर्यंत सर्वांचाच भ्रष्टाचारात सहभाग असल्याचे दिसते.
राज्य सरकारने महापालिकेवर प्रशासक नियुक्त करुन मागील चाडेचार वर्षातील आर्थिक उलाढालीची निपक्षपणे चौकशी करावी, अशीही मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.






Leave a Reply