Pawana Dam News : पवना धरणात 96.62 टक्के पाणीसाठा

Pawana Dam News : पवना धरणात 96.62 टक्के पाणीसाठा
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरासह मावळवासियांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात अधूनमधून पाऊस पडत आहे. पवना धरण परिसरात 24 तासात फक्त 8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात 96.62 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पिंपरी- चिंचवड, मावळवासियांच्या आणि शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

पवना धरण परिसरात 1 जूनपासून 2 हजार 45 मिलीमीटर पाऊस पडला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 1243 मिलीमीटर पावसाची नोंदणी झाली होती.
गतवर्षी आज अखेर 77.01 टक्के इतका तर यावर्षी 96.62 टक्के पाणीसाठा झाला आहे. 24 तासात 0 टक्के पाणीसाठा वाढला आहे. तर एक जूनपासून धरणात 65.03 टक्के पाणीसाठा वाढला आहे.

💦 गेल्या २४ तासात झालेला पाऊस = *08मि.मि.*

💦 १ जूनपासून झालेला पाऊस = *2045मि.मि.*

💦 गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 1243
💦 धरणातील सध्याचा पाणीसाठा = *96.62% टक्के*

💦 गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = * 77.01% टक्के*

💦 गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= *0.00% टक्के*

💦 १ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = *65.03% टक्के*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *