Wakad Crime News : दागिने पाॅलिश करून देण्याचा बहाणा, दागिने घेऊन भामटे पसार

 

Wakad Crime News : दागिने पाॅलिश करून देण्याचा बहाणा, दागिने घेऊन भामटे पसार

Pckhabar- दागिने पाॅलिश करून देण्याचा बहाण्याने महिलेचा विश्वास संपादन करून चोरटे 61 हजार रुपयांचे दागिने घेऊन पसार झाले. ही घटना काल मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी आरोपी फिर्यादी यांच्या घरासमोर आले. आरोपींनी दागिने पाॅलिश करून देण्याचा बहाणा करत महिलेचा विश्वास संपादन केला. महिलेने 61 हजार रूपये किंमतीचे 20 ग्रॅम दागिने
आरोपींकडे दिले. आरोपी दागिने घेऊन पसार झाले.

वाकड पोलीस तपास करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *