Nigdi News : समाजासाठी कोरोना योद्धयांचे योगदान मोलाचे: शरद इनामदार
Pckhabar-कोरोना महामारीने संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातला असताना अनेक डॉक्टर्स , पोलीस आणि नगरसेवकांनी देखील आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची अविरत सेवा केली. या कोरोना योध्दयांच्या योगदानामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाल्याचे गौरवोद्गार शरद इनामदार यांनी काढले.
यमुनानगर निगडी येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न शैक्षणिक संकुलांच्यावतीने आयोजित ‘कोरोना योद्धा सन्मान’ या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कोरोना योध्दा म्हणून स्टर्लिंग हॉस्पीटलचे संचालक डॉ.अभिषेक करमारकर , निगडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड , पोलीस उपनिरीक्षक उत्तम ओमासे , पिं. चिं. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मेघा खरात , डॉ. नेहा देशपांडे , नगरसेविका सुमनताई पवळे , कमलताई घोलप , सचिन चिखले , उत्तम केंदळे , डॉ. अरूंधती करमारकर , अनुराधा आंबेकर यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी शरद इनामदार म्हणाले, या कोरोना काळात अनेक कोरोना योध्दयांनी जीवावर उदार होऊन , जनतेची सेवा केली आहे. त्यांच्या प्रती कृत्तज्ञता म्हणून समाजाकडून त्यांचा सन्मान होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी कोरोना योध्दा सन्मान प्राप्त डॉ. अरूंधती करमारकर , यांनी या सन्मानाने अधिक ऊर्जेने काम करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली. तर नगरसेवक सचिन चिखले , उत्तम केंदळे म्हणाले आम्ही अनेकांचा सन्मान करतो मात्र मॉडर्न शाळेने आमचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान दिल्याने आमची जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले. तसेच कोरोना काळातील कार्यासाठी शहरात प्रथमच असा सन्मान मिळाल्याची सुखद भावना व्यक्त केली.
यावेळी संस्था उपकार्यवाह शरद इनामदार , प्राचार्य प्रकाश पाबळे , प्राचार्य डॉ. प्रवीण चौधरी , राजीव कुटे , डॉ. सदाशिव शिरगावे , डॉ.मनोज साठे , डॉ. प्रकाश करमाडकर , पांडुरंग मराडे ,गौरी सावंत , तृप्ती वंजारे , संगीता घुले उपस्थित होते.
सर्व पुरस्कारार्थीचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे , सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले.
कार्यक्रमासाठी गंगाधर सोनवणे , शिवाजी अंबिके , गंगाधर वाघमारे ,हनमंत तापकीर , अमोल नवलपुरे , श्रीकृष्ण निकम, प्रशांत कुलकर्णी , कुसुम पाडळे या शिक्षकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप गुंड व सुरेखा कामथे यांनी केले.






Leave a Reply