Chikhali News : सार्वजनिक वाचनालय आणि जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन
Pckhabar- चिखली प्रभाग क्र.2 जाधववाडी, मोशी,पेठ क्र 16 मध्ये सार्वजनिक वाचनालय आणि जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
सार्वजनिक वाचनालय व जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उद्घाटन सोहळा रिव्हर सोसायटी मोशी येथे पार पडला. विद्यमान नगरसेविका अश्विनी जाधव, युवा नेते संतोष जाधव यांच्या संकल्पनेतून संपन्न झाला. यावेळी नगरसेविका शारदा सोनवाने, नगरसेविका साधना मळेकर, नगरसेविका स्वीनल म्हेत्रे आदी उपस्थित होते.
साईजीवन मनपा शाळा,अभिनव इंग्लिश मीडियम स्कुल, ज्ञानाई शिक्षण संस्था, इंद्रधनू सोसायटी,सुभाष मित्र मंडळ, संकेश्वर ड्रीम,ऐश्वर्याम हमारा, मिलेनियम प्यारामाउंट,साईवास्तु,अक्षा, अक्षा वृंदावन,सिल्वर म्हाडा, पेठ क्र.16 राजेशिवजीनगर येथे भाजी मंडई,विठ्ठल रखुमाई एकटा नागरिक संघ या ठिकाणी माजी महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
घरकुलमध्ये स्वातंत्र्य दिनी मोफत आरोग्य शिबिर संपन्न
75 स्वातंत्र्य दिना निमित्ताने घरकुल मधील आनंदी गृहरचना सोसायटीमधे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिरासाठी प्रशांत बहीर,सारीका मुंडे याच्या प्रयत्नातुन डाॅ राजश्री बिराजदार ,डॉ.शितल घारे यांनी 80 नागरिकांची आरोग्य चिकित्सा केली. प्रवीण बहीर, अक्षय बर्गे, अशोक मगर यांनी या शिबिराचे संयोजन केले.






Leave a Reply