Pimpri News : शहरात पहिले मोफत औद्योगिक कायदे सल्ला केंद्र सुरू होणार
करकायदे सल्लागार अँड. आप्पासाहेब शिंदे यांची माहिती
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील पहिले करकायदे सल्लागार अँड. आप्पासाहेब शिंदे यांच्या व्यवसाय कारकीर्दीस 30 जुलै 2021 रोजी 41 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त अॅड. शिंदे शहरात पहिले मोफत करकायदे व औद्योगिक कायदे सल्ला केंद्र सुरू करणार आहेत.
याबाबत अॅड. आप्पासाहेब शिंदे म्हणाले, मोफत करकायदे औद्योगिक व शेती औद्योगिक क्षेत्राबद्दल सल्ला केंद्र बिजलीनगर येथे लवकरच सुरू करणार आहोत.
सल्ला व मार्गदर्शन करणारा उपक्रम नक्कीच करदात्यांना भावेल असे वाटते. इच्छुकांनी आपले नाव पूर्व नोंदणीसाठी मो. नं. 9371070023 किंवा 98503899023 वर आपले नाव, ठिकाण व मो. नं. नोंदविण्याचे आवाहन अॅड. शिंदे यांनी केले आहे.
अॅड. शिंदे हे स्वत: 41 वर्षापासुन करक्षेत्रातील अभ्यासक आहेत. त्यांचे कुटुंबातील एक सुन कॉस्ट अकाऊंटंट, दुसरी चार्टड अकाऊंटंट असुन तिघे मिळून मे. शिंदे अँड शिंदे असोसिएशन ही फर्म चालवतात. त्याचा लाभ करदात्यांना होईल असे अॅड. शिंदे यांनी जाहीर केले आहे.










Leave a Reply