Pimpri News : गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी वल्लभनगर आगारातून ज्यादा बसेस

Pimpri News : गणेशोत्सवानिमित्त वल्लभनगर आगारातून ज्यादा बसेस

Pckhabar-गौरी-गणपती सणानिमित्त वल्लभनगर एसटी आगारातून 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान कोकणासाठी 27 जादा बसेस धावणार आहेत. तसेच प्रवाशांची संख्या वाढल्यास बसची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती वल्लभनगर स्थानक प्रमुख गोविंद जाधव यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मोठ्या संख्येने कोकणवासीय वास्तव्यास आहेत. कोकणासाठी वल्लभनगर आगारातून सुमारे 25 टक्के बसेस सोडण्यात येतात.  कोकणवासियांची गौरी-गणपती सण आपल्या मूळगावी साजरा करण्याची प्रथा आहे.
यामुळे या सणादरम्यान कोकणामध्ये जाणार्‍या प्रवाशांची संख्या दरवर्षी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे वल्लभनगर आगाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जादा बसेसची नियोजन करण्यात आले आहे.
चिपळूण, गणपतीपुळे, दापोली, देवरुख, गुहागर, खेड, महाड, रत्नागिरी या ठिकाणी बसेस 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान धावणार आहेत. तसेच किमान 40 प्रवाशांचा ग्रुप असल्यास त्यांना आपल्या मूळ गावी एसटी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

वल्लभनगर स्थानक प्रमुख गोविंद जाधव म्हणाले’’ गौरी-गणपती सणानिमित्त वल्लभनगर एसटी आगारातून 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान कोकणासाठी 27 जादा बसेस धावणार आहेत. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशी संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता बसची संख्याही वाढवण्याचे नियोजन आहे. तसेच ज्यादा बसेसचा जास्तीत-जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे’’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *