Pimpri News : घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना स्वहिस्सा भरण्यास मुदतवाढ

Pckhabar-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या से.क्र. १७ व १९ चिखली येथे आर्थिक दुर्बलांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी  ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 ही अंतिम मुदतवाढ असून या मुदतीमध्ये स्वहिस्सा रक्कम न भरणा-या लाभार्थ्यांचे नाव निवड यादीतून रद्द करण्यात येईल असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

स्थायी समिती सभेने ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत लाभार्थ्यांना स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी याबाबतच्या प्रस्तावास मान्यता दिली होती.

संगणकीय सोडतीमधील प्रतिक्षा यादीमध्ये असलेल्या प्रवर्गानिहाय ४५६ लाभार्थींना घरकुल योजनेमध्ये स्वहिस्सा रक्कम  भरणेकामी मान्यता देण्यात आलेली आहे. तरी संबंधित लाभार्थींनी प्रथम स्वहिस्सा 50 हजार रुपये व उर्वरीत स्वहिस्सा 3 लाख 26 हजार असे एकूण  3 लाख 76 हजार भरण्यासाठी ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती.

आता दि. ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

निवड झालेल्या या लाभार्थ्यांची यादी महानगरपालिकेच्या https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php या संकेतस्थळावर तसेच झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग, चिंचवड येथे पाहण्यास उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *