Talegaon Dabhade News : आंबळे गावात बेकायदा गौण खनिजाचे उत्खन्नन; माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आरोप

Talegaon Dabhade News :
आंबळे गावात बेकायदा गौण खनिजाचे उत्खन्नन; माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आरोप
Pckhabar- मावळ तालुक्यातील आंबळे गावी बेकायदा गौण खनिजाचे उत्खन्नन सुरू आहे. यामुळे शासनाचा कोट्यावधी रूपयांचा महसूल बुडल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी येथे आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत केला. तसेच या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे उपस्थित होते.

सोमय्या यांनी आंबळे गावी बेकायदा गौण खनिजाचे उत्खन्नन चाललेल्या ठिकाणास भेट देऊन पाहाणी केली. त्यानंतर त्यांनी वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात जावून मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची भेट घेतली. बेकायदेशीर उत्खन्ननाबाबत त्यांच्याकडून माहिती घेतली.

आंबळे  गावातील दोन गटांना गौण खनिज उत्खनाची परवानगी दिली आहे. ८ गटात बेकायदेशीर उत्खन्नन मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे यावेळी  सोमय्या यांनी त्यांचे निदर्शनास आणून दिले.

बेकायदेशीर उत्खन्ननामुळे निसर्ग व पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत होत आहे. तर गौण खनिजाचे उत्खन्ननामुळे नजीकच्या धरणाला देखील धोका निर्माण झाला असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *