Pimpri News : फायनान्स कंपन्यांची गुंडगिरी थांबवा; लाल बावटा रिक्षा युनियनचे पोलीस आयुक्तांना निवेदन

Pimpri News : फायनान्स कंपन्यांची गुंडगिरी थांबवा; लाल बावटा रिक्षा युनियनचे पोलीस आयुक्तांना निवेदन

Pckhabar- कोविडच्या आपत्तीमुळे अनेक रिक्षा चालकांचे व्यवसाय बंद पडले असल्यामुळे साहजिक हप्ते थकले आहेत. सर्व फायनान्स कंपनीच्या दादागीरी, गुंडगीरी, असंवेदनशीलता या कारणांमुळे सर्व रिक्षाचालकांचे जीने हराम झाले आहे. फायनान्स कंपन्या रिक्षा चालकांना त्रास देत आहेत. पुण्यात तर एका रिक्षा चालकाला फायनान्स कंपनीच्या गुंडांनी मारहाण केली आहे. त्यामुळे फायनान्स कंपन्यांची गुंडगिरी थांबवावी, अशी मागणी लाल बावटा रिक्षा युनियनच्या वतीने करण्यात आली आहे.

लाल बावटा रिक्षा युनियनच्या वतीने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  पिंपरी चिंचवड शहरात हजारो बेरोजगार तरुणांनी आपल्या कुटुंबाची उपजीविका करण्यासाठी रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत आहेत. या कामगारनगरीत हजारो लोकांना सेवा देण्याचे काम रिक्षावाले बंधू करत आहेत, मागील दीड वर्षा पासून कोविडच्या आपत्तीमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले असल्यामुळे साहजिक हप्ते थकले आहेत. सर्व फायनान्स कंपनीच्या दादागीरी, गुंडगीरी, असंवेदनशीलता या कारणांमुळे सर्व रिक्षाचालकांचे जीने हराम झाले आहे. कोरोनामुळे असंख्य रिक्षाचालकांचे जे

वेळोवेळी नियमीत वेळेत हफ्ते भरत असत, त्यांची हि कमाई कमी झाली आहे. परिणामी रिक्षाचालकांना उदरनिर्वाह चालवणे कठिण होऊन बसले आहे. रिक्षाचालकांचे मुलांचे शिक्षण थांबले आहे. रिक्षाचालकांचे संपुर्ण आर्थिक चक्र पुर्णपणे कोलमडले आहे. खाजगी फायनान्स कंपन्याच्या अनधिकृत गुंडाकडून थकीत कर्ज असलेल्या रिक्षाचालकांकडुन कारवाईचा दडंका ऊगारुन व दंडेलशाही करुन हफ्त्याच्या पैशाच्या चारपट पैसे उकळले जात आहेत. संबंधी रिक्षा या बेकायदेशीरपणे अडवून शिवीगाळ करुन ताब्यात घेतल्या जात आहेत. कर्जाच्या हफ्त्यासह आमचीही वसुली फी द्यावी लागेल अशी दाटावणी केली जात आहे.

वास्तविक अशा प्रकरणात पोटावरचे जीव असणा-या, कर्ज घेऊन चार पैसे कमवुन रिक्षा घेणारे रिक्षाचालकांची अवस्था दिवसें दिवस गंभीर होत चाललेली आहे. परंतु या सर्व गोष्टींचा फायदा या फायनान्स कंपन्या उचलत आहेत अनेक रिक्षा ओढुन नेऊन रिक्षावाल्या बंधूना नैराश्य व बरोजगारीच्या खाईत ढकलण्याचे काम या कंपन्या व त्यांचे भाड्याचे गुंड करीत आहेत. या कारणांमुळे नैराशात जाऊन आत्महत्या सारखे पाऊल उचलण्यासारखे अनर्थ घडण्याची शक्यता आहे, तरी कृपया आपण यामध्ये लक्ष घालून फायनान्स कंपन्याचे गुंड व मॅनेजमेंटवर योग्य ती पोलीस यंत्रणेने कार्यवाई करावी व रिक्षाचालकांना न्याय द्यावा अशी विनंती लाल बावटा रिक्षा युनियनचे केली आहे.

लाल बावटा रिक्षा युनियन,पिंपरी चिंचवडचे सचिव गणेश दराडे, सचिन देसाई, अमिन शेख,अपर्णा दराडे,गौस शेख, सिद्राम बोऱ्हाडे, स्वप्निल जेवळे, इम्रान तांबोळी यांनी दिलेले निवेदन पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी स्वीकारले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *