Dehu News : रोटरी क्लब ऑफ देहूच्या वतीने गथसमेने वृद्धाश्रमास व्हीलचेअर्स, स्ट्रेचर ट्राॅली व कपड्यांचे वाटप
Pckhabar-रोटरी क्लब ऑफ देहू आणि रो. राकेश अगरवाल यांच्या विशेष प्रयत्नातून रो. गणेश सावंत यांच्या मातोश्री कै. जनाबाई चांगदेव सावंत व रो. संदीप गाडे पाटील यांचे वडील कै. बाजीराव गाडे पाटील यांच्या स्मरणार्थ देहूगाव येथील गथसमेने वृद्धाश्रमास व्हीलचेअर, स्ट्रेचर ट्राॅली व कपड्यांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सृजन फाउंडेशन या शैक्षणिक संस्थेचे सचिव प्रा. विकास कंद, राष्ट्रवादी पक्ष देहुचे शहराध्यक्ष्य श्री. प्रकाश हगवणे व या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून अनिल काळे सर उपस्थित होते.
यावेळी प्रा. विकास कंद म्हणाले, गथसमेने वृद्धाश्रमास यापुढील काळातही देहू पंचक्रोशीतील सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विशेष सहकार्य केले जाईल.
रोटरी क्लब ऑफ देहूच्या या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक माजी उपसरपंच प्रकाश हगवणे यांनी आपल्या मनोगतात केले.
रोटरी क्लब ऑफ देहूचे विद्यमान अध्यक्ष रो. रामदास साठे, सचिव रो. योगेश काळोखे, रो. ॲड. संजय भसे, रो ॲड. राज तिटकारे, रो. नितीन बोत्रे, रो. दत्तात्रय कारके आदींनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
गथसमेने वृद्धाश्रमाचे संचालक संतोष जाॅय सर व ज्योत्स्ना मॅडम यांनी या उपक्रमाबद्दल रोटरी क्लब ऑफ देहूचे विशेष आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रो. संदीप भोसले यांनी केले तर आभार रो. रामदास साठे यांनी मानले.










Leave a Reply