Pimpri News : वृक्ष गणनेसाठी चालढकल; झाडांवर बसून रयत विद्यार्थी परिषदेतर्फे आंदोलन

 

Pimpri News : वृक्ष गणनेसाठी चालढकल; झाडांवर बसून रयत विद्यार्थी परिषदेतर्फे आंदोलन
Pckhabar-पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून वृक्ष गणना संदर्भात चालढकल केली जात आहे. याचा निषेध म्हणून उद्यान व वृक्षसंवर्धन विभाग नेहरूनगर येथील झाडांवर बसून रयत विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज (गुरूवार) आंदोलन करण्यात आले.

रयत विद्यार्थी परिषदेने वृक्षगणना आणि संवर्धन यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार केला आहे. परंतु पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून सतत चालढकल केली जात आहे. याच संदर्भात रयत विद्यार्थी परिषदेच्या वतीने 6 जुलै 2021 रोजी मनपा भवनासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. यासंदर्भात उद्यान विभाग आणि उपायुक्त सुभाष इंगळे यांनी पत्राचे उत्तर देखिल दिले नाही. याचा निषेध म्हणून आम्ही रयत विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी लवकरात लवकर वृक्षगणना काम पुर्ण करणे, संबंधित ठेकेदार यास काळ्या यादीत टाकाणे ,या संबंधित ठेकेदारास पाठिशी घालणा-या अधिका-यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रयत विद्यार्थी परिषदेचे सचिव रविराज काळे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *