Pimpri Crime News : दोनशे रूपयांसाठी तरूणाचा खून, चार वर्षांनंतर आरोपींना बेड्या
Pckhabar- दारू पिण्यासाठी एकत्र बसलेल्या तिघांपैकी दोघांनी एकाच्या खिशातील दोनशे रूपये काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावरून झालेल्या वादावादीतून दोघांनी तरूणाला फरशीचे तुकडयाने डोक्यावर मानेवर, हनुवटीजवळ, मारहाण करून खून केला. ही घटना चार वर्षांपुर्वी रहाटणी येथे घडली होती. या खून प्रकरणातील दोन आरोपींना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अंकुश दिलीप खडसे (वय-30, रा. एल. आय. सी. कॉलनी, भारतमाता चौक, काळेवाडी), विष्णु देवराव चित्ते (वय-31, रा. रहाटणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 30 वर्षीय तरूणाचा खून झाला होता.
वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जानेवारी 2017 मध्ये 30 वर्षीय तरूण आणि आरोपी पिंपरीत दारू पित बसले होते. दारु पिल्यावर आरोपी पिंपरी स्मशानभुमी येथे गेले. तेथे आरोपींनी मृत्यू झालेल्या तरूणाच्या खिशातील दोनशे रूपये काढून घेण्याचा प्रयत्न केला. तरूणाने विरोध केल्यानंतर आरोपींनी फरशीच्या तुकड्याने जबर मारहाण करून त्याचा खून केला होता. यातील आरोपी पिंपरीत येणार असल्याची माहिती पोलीस अमलदार नितीन मैगजे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून चार वर्षांनंतर आरोपींना अटक केली आहे.










Leave a Reply