Pimpri Crime News : तरूणाच्या खून प्रकरणी आरपीआयच्या माजी शहराध्यक्षाला अटक
Pckhabar-काठीने मारहाण करून एका तरुणाचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरपीआयचा (आठवले गट) पदाधिकारी सुरेश ऊर्फ चिम्या निकाळजे याला आज (मंगळवार) अटक केली आहे.
मनोज राजू कसबे (वय 25, रा. मिलिंद नगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी काळ्या उर्फ सचिन निकाळजे (वय 40), शौकत समीर शेख (वय 32, दोघे रा. मिलिंदनगर, पिंपरी) या दोघांना अटक केली. त्यानंतर मंगळवारी आरपीआयचा पदाधिकारी चिम्या ऊर्फ सुरेश निकाळजे याला अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्या आरोपींसह मनोज अर्जुन जगताप, आनंद कदम, संतोष कदम, भूषण डुलगल व त्यांच्या इतर साथीदारांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत मनोज यांच्या आई पुष्पा राजू कसबे (वय 50, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.










Leave a Reply