Maval News : मावळ शिक्षण प्रतिष्ठान शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी आमदार सुनिल शेळके
Pckhabar – मावळ शिक्षण प्रतिष्ठान या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी आमदार सुनिल शेळके यांची आज (मंगळवार) एकमताने निवड करण्यात आली. ही निवड पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.
यावेळी डॉ.कृष्णकांत वाढोकर, यादवेंद्र खळदे, कान्हू पडवळ, नंदकुमार शेलार, वसंत पवार, संजय भालेराव, नानासाहेब जगताप, दत्तात्रय बाळसराफ, नंदकुमार काळोखे, चंद्रकांत काकडे, वसंत भावे, संजय माळी उपस्थित होते.
संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष डॉ.कृष्णकांत वाढोकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली. संस्थेचे ज्येष्ठ सदस्य यादवेंद्र खळदे यांनी अध्यक्षपदासाठी आमदार शेळके यांचे नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला चंद्रकांत काकडे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने आमदार शेळके यांच्या निवडीला मान्यता दिली.










Leave a Reply