Pimpri News : नोकरी, कौशल्य विकास मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
80 बेरोजगार तरुणांना मिळाली नोकरी
Pckhabar- पिंपरी- चिंचवड महापालिका, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि स्टाफ ब्लूम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ’नोकरी व कौशल्य विकास’ मेळाव्याला तरूण-तरूणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सदन, येथील लायन्स स्किल सेंटर या ठिकाणी ’नोकरी व कौशल्य विकास’ मेळाव्याचे आज (गुरूवार) सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत आयोजन केले होते.
या उपक्रमास इंटरनॅशनल डायरेक्टर लायन नरेंद्र भंडारी, प्रांतपाल लायन हेमंत नाईक, माजी प्रांतपाल लायन ओमप्रकाश पेठे यांनी सदिच्छा भेट देऊन कौतुक केले. कौशल्य विकास प्रमुख लायन अशोक येवले, लायन तीर्थप्रसाद मुखर्जी, लायन वसंत गुजर, संदीप पाटील, कल्पेश पाटील, जयंत तांबडे, श्रीमती श्रुतिका मुंगी यांनी मेळाव्याचे आयोजन व यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका निभावली.
याबाबत कौशल्य विकास प्रमुख लायन अशोक येवले म्हणाले, ’नोकरी व कौशल्य विकास’ मेळाव्यासाठी 500 तरूणांनी नावनोंदणी केली होती. प्रत्यक्षात 125 जण सहभागी झाले होते तर उर्वरित तरूण-तरूणी ऑनलाईन सहभागी झाले होते. या मेळाव्यासाठी अॅटोमोबाईल, सर्व्हिस, आयटी अशा क्षेत्रातील 20 नामाकिंत कंपन्या सहभागी झाल्या होत्या. आजच्या मेळाव्यात 80 बेरोजगारांना नोकरी मिळाली आहे. गेल्या तीन महिन्यात 1 हजार पेक्षा जास्त बेरोजगारांना नोकरी मिळवून दिली आहे.’ तसेच असे मेळावे वारंवार घेण्याचे नियोजन असल्याचेही ते म्हणाले.
लायन रामकृष्ण मंत्री, लायन दिलीपसिंह मोहिते, लायन विक्रम माने, लायन हिरामण गवई, लायन राजेंद्र कोळी, लायन सुनिल जाधव, लायन राजेश शर्मा यांनी मेळाव्यास भेट देऊन आयोजकांचे मनोधैर्य वाढविले.










Leave a Reply