Talegaon Dabhade Crime News : धक्कादायक! एकच जागा दोघांना विकली; 52 लाखांची फसवणूक, सहा जणांवर गुन्हा दाखल
Pckhabar- एकच जागा दोघांना विकून 52 लाखांची फसवणूक करणाऱ्या दोन महिलांसह सहा जणांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिताराम गणा आगळे, किरण सिताराम आगळे, प्रियंका किरण आगळे, चंद्रकांत शेलार, मंदा चंद्रकांत शेलार, मच्छिंद्र विजय कोल्लम (सर्व रा. दारूब्रे. मावळ जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी धनंजय काशी पाटील करावे (वय-37, रा. डांगे चौकाजवळ, वाकड) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गट नं. २६ मधील २४ आर चे साठेखत दस्त क्र. १९३३ / २०१८ २२/०३/२०१८ रोजी कुलमुखत्यापत्र फिर्यादीचे नावे दुय्यम निबंधक कार्यालय मावळ २ येथे करून दिले. या जागेसाठी आरोपींनी फिर्यादी कलाटे यांच्याकडून ५२ लाख २५ हजार रुपये घेतले.
आरोपींनी हीच जागा देविसिंग चितोडीया यांना २६/३/२०२१ रोजी दस्त क्र. ३४५७/२०२१ अन्वये वडगाव मावळ इय्यम निबंधक वडगाव मावळ २ येथे देबिसिंग पन्नीसिंग चितोडीया (रा. वारंबे ता.मावळ जि. पुणे) यांना खरेदीखत करून दिली.
फिर्यादी यांनी जागा खरेदी केल्यानंतर तिच जागा देबिसिंग पन्नीसिंग चितोडीया यांना खरेदी करून देऊन कलाटे यांची 52 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.










Leave a Reply