Pimpri News : डाॅ. अमित नेमाणे यांना “यंग अचिव्हर २०२१” पुरस्कार जाहीर

Pimpri News : डाॅ. अमित नेमाणे यांना “यंग अचिव्हर २०२१” पुरस्कार जाहीर
Pckhabar-व्हस्पा प्रिव्हेन्टीव्ह हेल्थ ट्रस्ट तर्फे देण्यात येणार ‘ यंग अचिव्हर २०२१ , पुणे ‘ पुरस्कार , दंतरोगतज्ञ आणि व्याख्याते डॉ अमित नेमाणे यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक डॉ. विजय मोरे यांनी पिंपरी चिंचवड खबर या वृत्त संस्थेशी बोलताना दिली.

तरूण वयात समाजिक जाणिवांचे भान ठेवून यश संपादन करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दरवर्षी ‘व्हस्पा प्रिव्हेन्टीव्ह हेल्थ’ ट्रस्ट तर्फे देण्यात येतो.

अनेक ठिकाणी ‘मोटिव्हेशनल स्पिकर’ म्हणून अनेकांच्या समाजिक जीवनावर प्रभाव असणाऱ्या डॉ नेमाणे यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्या संदर्भात बोलताना डॉक्टरांनी संस्थेचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *