Alandi News : अलंकापुरीत इंद्रायणीला महापुर ;  पुंडलिक मंदिरात पाणी 


Alandi News : अलंकापुरीत इंद्रायणीला महापुर ;
पुंडलिक मंदिरात पाणी

Pckhabar- इंद्रायणी नदीचे पाणलोट
क्षेत्रासह लाभक्षेत्रात होत असलेल्या
जोरदार  पावसाने अलंकापुरीत इंद्रायणी नदीला आलेल्या महापुराचे पाण्याने इं
द्रायणी नदीने काठ सोडून वाहू लागली आहे. महापुराचे पाणी दुतर्फा
पसरले असून नदी काठाचे रस्ते रहदारीला बंद झाले आहेत. या महापुराचे पाणी
शनी मारुती मंदिर परिसर , राम घाट,
भक्त पुंडलिक मंदिर, स्वामी महाराज मठ मागील चौंडी घाट परिसरात घुसले आहे. यामुळे नदी घाटावर अनेक ठिकाणी
रहदारी बंद झाली आहे.

  महापुराचे पाणी पाहण्यास नदी घाटावर तसेच पुलांचे वर दुतर्फा भाविकांसह
नागरिकांनी गर्दी करुन महापुराचे पाणी पाहत सेल्फीचा आनंद लुटत असताना दिसत आहेत. दक्षता म्हणून पुलांवर जास्त वेळ उभे राहू दिले जात नाही. इंद्रायणी
नदी घाटाचा परिसर,भक्ती पुंडलिक
मंदिरात पाणी शिरले असून माऊलींचे
दर्शन बंद झाले आहे. इंद्रायणी नदीवरील घाटा लगतचे महात्मा गांधी यांचे रक्षा
विसर्जन स्थळ स्मारकास पाण्याने वेढले आहे. भक्ती सोपान पूल आणि के. टी
बंधारा पाण्यात बुडाला आहे.

घाटावरील अनेक संत, महाराज यांच्या समाधी पाण्यात बुडालेल्या आहेत. नदीचे दुतर्फा रस्ते रहदारीला धोकादायक
असल्याने
नागरिकांनी, भाविकांनी दक्षता
बाळगण्याचे आवाहन मुख्याधिकारी
अंकुश जाधव यांनी केले आहे. अग्निशामक विभाग,
आपत्ती व्यवस्थापन कक्ष तैनात करण्यात आला आहे. जीवरक्षक तैनात असून खडा पहारा
ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *