Pimpri News : RTE प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

Pimpri News : RTE प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Pckhabar- शिक्षणाचा अधिकार कायद्यान्वये गरीब घरातील मुलांना प्रवेश देण्यास नकार देणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांवर कारवाई करावी या मागणीसाठी  तसेच  शिक्षण शुल्कामध्ये 50 टक्के सवलत द्यावी, आणि आरटीई च्या परताव्याच्या थकित रकमेच्या पन्नास टक्के रक्कम ताबडतोब संस्थांना अदा करावी, या मागण्यांसाठी  पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली  आंदोलन करण्यात आले.

प्रशासनाच्या वतीने शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी जोत्स्ना शिंदे यांनी संबंधित शिक्षण संस्थांवर कारवाई करण्याबाबतचे, व आरटीई अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांपैकी कोणीही प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असे लेखी आश्वासन देणारे पत्र आंदोलनकर्त्यांना दिले.

 या आंदोलनात  मानव कांबळे,  माजी नगरसेवक कैलास कदम, विनोद गायकवाड, नीरज कडू, संदीप जाधव, उदयकुमार पाटील, धनाजी येळकर पाटील,  सतीश काळे, सुरेश गायकवाड, कैलास जोगदंड,  आनंदा कुदळे, प्रदीप पवार, लक्ष्मण रुपणर, विश्वनाथ खंडाळे,  प्रकाश जाधव,  दिलीप पवार,  विशाल जाधव,  चेतन बेंद्रे, प्रल्हाद कांबळे, विजय नवले, दिलीप रणपिसे,  बाबा कांबळे,  संदिपान झोंबाडे, धम्मराज साळवे, संतोष शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *