Bhosari Crime News: ‘क्रेडीट कार्डची लिमीट’वाढवून देण्याचे सांगून तरूणाची पावणेदोन लाखांची फसवणूक

 

Bhosari Crime News: ‘क्रेडीट कार्डची लिमीट’वाढवून देण्याचे सांगून पावणेदोन लाखांची फसवणूक
Pckhabar-’एसबीआय कस्मटर केअरमधून बोलत असून तुमच्या क्रेडीट कार्डची लिमीट वाढवून देतो,’ असे एका तरूणाला सांगून एकाने मोबाईलवर आलेला कोड सांगण्यास भाग पाडून त्याव्दारे कार्डमधून 1 लाख 67 हजार रूपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना मोशी येथे नुकतीच उघडकीस आली.
रणजित अरूण पाटील (वय-33, रा. बोराटेवाडी, आळंदी-देहूरोड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7518961910 या मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने 7518961910 मोबाईलवरून फिर्यादी पाटील फोन करत ’एसबीआय कस्मटर केअरमधून बोलत असून तुमच्या क्रेडीट कार्डची लिमीट वाढवून देतो,’ असे अमिष दाखविले. या अमिषाला बळी पडून पाटील यांच्या मोबाईलवर एक कोड आला. तो कोड सांगण्यास भाग पाडून त्याव्दारे कार्डमधून 1 लाख 67 हजार रूपये काढून घेत ऑनलाईन फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *