

Talegaon Dabhade Crime News : वतननगरमध्ये भरदिवसा एक लाखांची घरफोडी
Pckhabar-भरदिवसा बालकणीच्या दरवाजातून अज्ञात चोरट्यांने घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे, चांदीचे दागिने, रोख रक्कम असा 1 लाख 13 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी दुपारी 1 ते 4 या वेळेत वतननगर येथील पारिजात सोसायटी येथे घडली.
सलील सतिश पारनेरकर (वय-36, रा. पारिजात सोसायटी, वतननगर, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे बुधवारी दुपारी 1 ते 4 या वेळेत घर बंद होते. या कालावधीत अज्ञात चोरट्याने खिडकीचे ग्रील तोडून अथवा बालकणीच्या दरवाजातून घरात प्रवेश केला. घरातील सोन्याचे, चांदीचे दागिने, रोख रक्कम असा 1 लाख 13 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.














Leave a Reply