Pimpri News : भाजपातर्फे शहरात १२५ हून अधिक समाजोपयोगी कार्यक्रम

Pimpri News :  भाजपातर्फे शहरात १२५ हून अधिक समाजोपयोगी कार्यक्रम
– राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे निमित्त
Pckhabar-महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड भाजपाने शहरात १२५ हून अधिक समाजपयोगी कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये आयुष्यमान भारत योजना अंतर्गत कार्ड वाटप,  नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच मास्क वाटप करण्यात येणार आहे. भाजपाचे शहरातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यामध्ये सहभाग घेणार आहेत.
भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयातून यावर्षी देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा, अशी सूचना देण्यात आली होती. त्याअनुषंगाने भोसरी विधानसभा मतदार सघाचे आमदार आणि भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे
तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवडमध्ये आज (गुरूवार) दि.२२ जुलै ते २ ऑगस्ट २०२१ दरम्यान विविध १२५ हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

भाजपचे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ७६ नगरसेवक आहेत. भाजपाची पिंपरी- चिंचवड महापालिकेमध्ये एक हाती सत्ता आहे. आज  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. मात्र हा वाढदिवस विधायक कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. यासाठी लांडगे आणि जगताप यांनी पुढाकार घेतला असून, नगरसेवकांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात विधायक कामे केली जात आहेत. यामध्ये आयुष्यमान भारत योजना अंतर्गत नागरिकांना ५ लाख विम्याचे संरक्षण देणाऱ्या कार्डचे वाटप तसेच नागरिकांची आरोग्य तपासणी हे महत्त्वाचे कार्यक्रम आहेत. याशिवाय मास्क, सॅनिटायझर वाटप केले जाणार आहे. प्रभाग स्तरावर या कार्यक्रमाचे नियोजन नगरसेवकांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *